🕒 1 min read
Udayanraje Bhosale | पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. यावेळी सर्वपक्षीयांनी मूक मोर्चा काढला. या मूक मोर्चात छत्रपती उदयनराजे भोसले देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, “साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे प्रेम होतं ते आज कुठेही कमी झालं नाही. शिवरायांचा तेव्हापेक्षा जास्त आदर वेगवेगळ्या धर्मातील लोकांमध्ये आज पाहायला मिळतो. ज्यावेळी आम्ही रायगडावर गेलो त्यावेळी मला वेदना झाल्या. ज्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा सम्मान झाला. त्याच रायगडावर निर्धार शिव सन्मानाचा आम्ही करायला गेलो. आज दुर्दैवाने सांगावं वाटत काही फुटकळ विकृत लोक जे कारण नसताना वादग्रस्त विधाने करतात. या लोकांमुळे शिवरायांचा सन्मान झाला पाहीजे हे सांगण्याची वेळ आपल्यावर आली आहे. यापेक्षा मोठी शोकांतिका नाही.”
“माझी भूमिका यापूर्वी मी मांडली आहे. पक्ष वैगरे बाजुला ठेवा. नूपुर शर्माच्या बाबतीत जी कारवाई झाली. त्याच प्रकारची कारवाई, राज्यपाल असतील, त्रिवेदी असेल. ज्या लोकांनी बेताल वक्तव्य केली त्यांच्यावर करण्यात यावी”, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर देखील राज्यपाल आणि भाजप नेते त्रिवेदी यांच्यावर पक्षाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच सर्व विरोधी पक्षांनी एकमताने बंदची हाक दिली आहे. या बंदला विविध व्यापारी संघटना, मराठा सेवा संघ, मुस्लिम संघटना, दलित संघटना, ऑटो युनियन, बँक युनियन आणि विविध संघटणांनी पाठिंबा दिला आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल –
राज्यपाल गेल्या महिन्यात औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलत होते. “जर कोणी विचारले की तुमचा आयकॉन कोण आहे, तर तुम्हाला कोणाच्या शोधात बाहेर पडण्याची गरज नाही. ते तुम्हाला इथे महाराष्ट्रात सापडतील. छत्रपती शिवाजी महाराज आता जुने झाले आहेत. तुम्ही नवीन लोकांना रोल मॉडेल म्हणून पाहू शकता. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत,” असे विधान राज्यपालांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या :
- PM Kisan Yojana | सरकारची मोठी घोषणा! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता
- Sanjay Raut | “…तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल”; संजय राऊतांचा भाजपाला इशारा
- Health Care Tips | सकाळी रिकाम्या पोटी मध आणि मनुका खाल्ल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- Aaditya Thackeray | भगतसिंह कोश्यारींना भाजपचा छुपा पाठिंबा आहे का? ; आदित्य ठाकरेंचा सवाल
- Upcoming Cars | 2023 मध्ये मारुतीच्या ‘या’ कार लाँच होणार, तर महिंद्रा सादर करणार ‘ही’ SUV
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

