बारामती : महराष्ट्रातील विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या अनेक दिवस उलटल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवल्या आहेत. यावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. ‘महाराष्ट्राच्या इतिहासात घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पहिला नाही’ अशा शब्दांत शरद पवारांनी टीका केली.
माळेगाव ता. बारामती येथे गोविंदबाग या निवासस्थानी राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केल आहे. ‘राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. घटनेनुसार राज्यसरकारने केलेल्या शिफारशींना मान्यता देणे ही राज्यपालांची जबाबदारी असते. महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाहीची आणि घटनेत असणारी जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी महाराष्ट्राने पहिला नाही. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा तत्कालीन राज्यपालांनी त्रास दिला होता. आता तशाच प्रकारे भगतसिंग कोश्यारी वागत आहे. मात्र, केंद्र सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, हे चिंताजनक आहे, अशी टीका शरद पवारांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि…’ ; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी
- …म्हणून महाराष्ट्रामध्ये ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी, निलेश राणेंची मागणी
- जिल्हा बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परभणीतील काही मतदार सहलीवर रवाना
- पाच पैकी फक्त एका राज्यात भाजपची सत्ता येणार, शरद पवारांचे भाकीत
- रणबीर, भन्साळी पाठोपाठ मनोज बाजपेयी, आशिष विद्यार्थी, तारा सुतारिया कोरोना पॉझीटीव्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
