Share

‘या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि…’ ; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : झोमॅटोवरुन जेवण ऑर्डर करुन ते कॅन्सल केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने चक्क महिलेला मारहाण केल्याचा दावा करणारा व्हिडीओ एका महिलने शेअर केला होता.या व्हिडीओमुळे काही क्षणातच सोशल मिडीयावर एकच खळबळ उडाली.

या व्हिडीओ मधील महिलेने सांगितले की, झोमॅटोवरून जेवण मागवले होते. ऑर्डरला उशीर होत असल्यानं महिलेनं कंपनीच्या कस्टमर केअरवर फोन केला आणि डिलिवरी वेळेवर न मिळाल्यानं ऑर्डर रद्द केली. कस्टमर केअर बोलत असतानाच डिलिवरी बॉय घरी जेवण घेऊन आला. त्यांतर मात्र या महिलेने जेवण घेण्यास नकार दिला. याच गोष्टीवरून त्यांच्यात वाद सुरु झाला.

नकार दिल्यानंतर देखील डिलिवरी बॉय जेवणाचा बॉक्स ठेवण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पीडीत महिलेने घरात शिरण्यास नकार केला. यातच डिलिवरी बॉय चिडून तुझा नोकर आहे का असे म्हणत तिच्या नाकावर एक पंच मारला आणि तेथून फरार झाला असा दावा या महिलेने केला.

दरम्यान, आता त्या डिलिवरी बॉयची देखील बाजू समोर आली असून ऑर्डर पोहोचवण्यास उशीर झाल्यानं सबंधित महिलेने शिवीगाळ करत चप्पलनं मारहाण केल्याचा दावा डिलीव्हरी बॉयनं केला आहे.संबंधित महिलेने कॅश ऑन डिलीव्हरी हा पर्याय स्वीकारला होता.ऑर्डर पोहोचवण्यासाठी उशीर झाल्यानं त्याने त्या महिलेची माफी मागितली होती.ट्रॅफिक जास्त असल्यानं आणि रस्ता खराब असल्यानं पोहोचण्यास उशीर झाल्याचं त्याने सांगितलं.

दरम्यान या डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला मदत करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा पुढे सरसावली आहे. या व्यक्तीला मी कशी मदत करु? असा सवाल तिनं झोमॅटोला केला आहे.

“झोमॅटो इंडिया कृपया या प्रकरणातील सत्य शोधून काढा. आणि आलेला रिपोर्ट सार्वजनिक करा. जर तो व्यक्ती निर्दोष असेल तर त्या महिलेविरोधात कारवाई करण्यासाठी मदत करा. हा प्रकार अमानविय आहे. तो व्यक्ती निर्दोष असल्याची मला पुर्ण खात्री आहे. कृपया मी त्या व्यक्तीला कशी मदत करु शकते याबाबत मला मार्गदर्शन करा.” अशा आशयाचं ट्विट परिणीतीनं केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!