मुंबई : या आठवड्यात बॉलीवूडमध्ये कोरोनाची लागण झालेल्य़ा कलाकारांच्या संख्येत वाढ होत आहे. अभिनेता रणबीर कपूर पाठोपाठ दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे कोरोना पॉझीटिव्ह आढळले. या पाठोपाठ बॉलीवूड मध्ये कोरोनाची जणू लाटच आली असल्याचे दिसुन येत आहे. शुटिंगच्या वेळी कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याने कोरोना चित्रपटसृष्टीत पसरत जात आहे अशी माहिती समोर येत आहे.
सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी मुख्य भूमिकेत असलेल्या ‘तडप’ या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री तारा सुतारिया ही कोरोना पॉझीटिव्ह आढळली आहे. याबद्दल अद्याप ताराकडून कोणत्याही प्रकारचा अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलान लूथरिया हे करत आहे. अभिनेते आशिष विद्यार्थी यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडीयावर एक व्हिडीओ पोस्ट करुन याची माहिती दिली आहे.
यादरम्यान अभिनेता मनोज बाजपेयी यानांदेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मनोज बाजपेयी हे डिसपॅच या चित्रपटाचे शूटिंग करत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक कानू बहल याना कोरोनाची लागण झाली आहे. दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याने काही दिवसांसाठी या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. तर मनोज बाजपेयीची प्रकृत्ती उत्तम असून त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याचे त्याच्या टीमकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोठा माणूस आणि त्याच्या षटकारांचे प्रेम प्रकरण’
- ‘कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली’
- पाठीवर थाप मारण्याचे कारण, पडेगावात तरुणाची हत्या
- मराठा आरक्षण सुनावणीपूर्वी छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- म्युझिक अल्बमच्या प्रमोशनसाठी प्रियांकाचा हॉट लूक, पहा फोटो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
