बारामती : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केल आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेचा पूर्ण गैरवापर करत आहे. बंगालमधील नागरिक हे स्वाभीमानी आहेत. बंगाली संस्कृतीवर आघात करण्याचा प्रयत्न कोणी केला तर संपूर्ण बंगाल एकसंध होतो. कोणी काही म्हणाले तरी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, याची मला खात्री आहे, असा आरोप पवार यांनी केला आहे. माळेगाव ता. बारामती येथे गोविंदबाग या निवासस्थानी राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीबाबत आपल मत व्यक्त केले.
सध्या पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आहेत. यापैकी केवळ आसाममध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होईल. मात्र केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल इतर पक्षांना यश मिळेल. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे पक्ष एकत्र आले आहेत. तसेच तेथील सत्ता देखील डाव्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये पुन्हा डाव्यांचे सरकार येईल. तर तामिळनाडूमधील लोकांचा कल स्टॅलिन व त्यांचा पक्ष डीएमके यांच्या बाजूने आहे. त्यामुळे तेथे डीएमकेची सत्ता येईल, असे सूतोवाच पवार यांनी केला आहे.
आसाममध्ये भाजपचे राज्य आहे. त्यामुळे आसामध्ये इतर राजकीय पक्षांपेक्षा भाजपची स्थिती चांगली आहे. त्यामुळे भाजपला यश मिळेल. पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल हे देशाला नवी दिशा देणारे ठरतील असेही पवार यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पाठीवर थाप मारण्याचे कारण, पडेगावात तरुणाची हत्या
- मराठा आरक्षण सुनावणीपूर्वी छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- म्युझिक अल्बमच्या प्रमोशनसाठी प्रियांकाचा हॉट लूक, पहा फोटो
- अरे बघताय काय सामिल व्हा… मनसेने घातली तमाम मराठीजनांना साद !
- लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात पण… , वाझेंच्या अटकेनंतर संजय राऊतांचं ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
