वाशीम : केंद्रीय मंत्री राज्यात दौरे करत आहेत. काल नारायण राणे वाशीम येथे एका कार्याकामानिमित्त दौऱ्यावर होते. आता राणे यांच्यावर राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी टीकाकेली आहे. नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांना आम्ही काहीच किंमत देत नाही. शिवसेनाही त्यांना काहीच किंमत देत नाही. केंद्राने त्यांना दिलेली सुरक्षा ही राज्यात फिरून शिवसेनेवर बोलण्यासाठी दिली आहे. मात्र त्यांची किंमत म्हणजे मायनस शून्य असून त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नसल्याचं राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
“दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे भोळे होते म्हणून नव्हे, तर कर्तुत्ववान होते म्हणून त्यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचे वर्चस्व निर्माण केले, राज्य आणले. त्यामुळे उगाच त्यांचं गुणांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करू नका,” अशा शब्दात केंद्रीय मत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. यानंतर शंभूराज देसाई यांनी राणेंना खोचक टोला लगावला आहे.
यानंतर राणे किवा त्यांच्या कुटुंबियांकडून अजूनही कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि राणे असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

