🕒 1 min read
औरंगाबाद : येथील सभेच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नव्या कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. ठाकरे यांच्या रविवारी झालेल्या भाषणाची औरंगाबाद पोलीस चौकशी करत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. याशिवाय शहर पोलिसांना जाहीर सभेबाबतचा अहवाल महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सादर करण्यास सांगितले आहे.
राज ठाकरे यांची संपूर्ण सभा आणि भाषण रेकॉर्ड करण्यात आल्याची माहिती आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून हे रेकॉर्डिंग करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान अटींचे उल्लंघन केल्याने तपासानंतर पोलीस ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विशेष म्हणजे या रॅलीबाबत पोलिसांनी ठाकरे यांच्यासमोर अनेक अटी ठेवल्या होत्या. रॅलीदरम्यान आणि नंतर आक्षेपार्ह घोषणा, धार्मिक, जातीय आणि प्रादेशिक टाळण्यास मनसे प्रमुखांना सांगण्यात आले होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ४ मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्यासाठी अल्टिमेट दिला आहे. अन्यथा सर्व हिंदू या धार्मिक स्थळांच्या बाहेर हनुमान चालीसा वाजवतील, असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेश सरकार लाऊडस्पीकर काढू शकते तर महाराष्ट्र सरकार का काढू शकत नाही, असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ४ मे मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याच्या मुदतीनंतर जे होईल त्याला मी जबाबदार नाही, असा इशारा देखील ठाकरे यांनी दिला.
राज ठाकरे म्हणाले, त्यांना नीट समजले नाही तर आम्ही त्यांना महाराष्ट्राची ताकद दाखवू. “मशिदींवर लावलेले सर्व लाऊडस्पीकर बेकायदेशीर आहेत. इतके लाऊडस्पीकर वापरता ही मैफल आहे का?, असे देखील ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

