🕒 1 min read
मुंबई: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बुस्टर सभेत बाबरी मशीद विषयावरुन शिवसेनेवर घणाघाती टीका केली. बाबरी मशीद पाडताना एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता. परंतु, बाबरी पाडताना मी उपस्थित होतो, बाबरी प्रकरणी 32 आरोपी भाजपमधील होते. त्यात शिवसेनेच्या एकाचाही समावेश नव्हता असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी थेट भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा व्हिडिओ ट्विट करत पुरावा दिला आहे. संजय राऊतांनी लालकृष्ण अडवाणींचा २९ डिसेंबर २००० रोजीचा व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओमध्ये बाबरी मशीद पाडण्याच्या विषयावर बोलताना अडवाणींनी मराठी भाषिकांचा उल्लेख केला आहे. त्यावरुन तिथे मराठी लोक म्हणजेच शिवसैनिक उपस्थित असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला आहे.
या ट्विटला कॅप्शन ‘बाबरी कोणी पाडली? ऐका….’ असे दिले आहे.
बाबरी कोणी पाडली?
ऐका…. pic.twitter.com/cnBTWLLiMI— Sanjay Raut (@rautsanjay61) May 2, 2022
या व्हिडिओत अडवाणी काय म्हणाले?
“बाबरी मशीद पाडणे ही खूप मोठी चूक होती. त्यात काहीही शंका नाही. मी पहिल्यांदा उमा भारती यांना तिथे पाठवलं आणि सांगितलं की त्यांना खाली उतरवा. त्यांना सांगा की असं काही करु नका. जेव्हा त्या परतल्या तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मशिदीवर काही लोक आहेत आणि ते ‘मराठी’त बोलत आहेत. ते माझं ऐकत नाहीयेत. त्यानंतर मी प्रमोद महाजनांना पाठवलं. ते तिथे गेले. पण, तेही हताश होऊन परत आले. त्यांनंतर मी माझ्यासोबतच्या पोलिसांना सांगितलं की मला वर जायचं आहे. पण, ते मला म्हणाले की आम्ही तुम्हाला त्याची परवागनी देऊ शकत नाही”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

