Share

रोहित पवारांनी वाचवला ऊसतोड मजुराच्या मुलाचा जीव; ट्विट करत म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार हे आपल्या मतदारसंघातील लोकांना वेळोवेळी मदत करत  असतात. त्यांच्या सेवेसाठी रोहित पवार नेहमीच पुढे असतात. आता अशाच एका घटनेमुळे रोहित पवारांचं कौतूक होत आहे. ऊसतोड मजुराच्या मुलाच्या मेंदुला मार लागला असताना रोहित पवारांनी त्याचा जीव वाचवला. यासंबंधी त्यांनी एक ट्विट देखील केलं आहे.

रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले, ” सांगलीमध्ये ऊसतोडीला गेले असताना दुचाकी अपघातात माझ्या मतदारसंघातील प्रविण फुंदे या चिमुकल्याच्या पायाला फ्रॅक्चर व मेंदूला जबर मार लागला होता. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार करण्याकामी लक्ष घातल्याने त्याचे वडील हरिदास फुंदे यांनी आग्रह करून मला घरी बोलावलं”.

 

पुढे दुसरे ट्विट करून म्हणाले, “घरी गेल्यानंतर अनपेक्षितपणे माझ्यावर फुलांचा वर्षाव केला. वैद्यकीय उपचारांसाठी गरजूंना नेहमीच मदत करत असतो पण काल अचानक झालेल्या या अनोख्या स्वागताने भारावून गेलो आणि लोकांसाठी अधिक जोमाने काम करण्यास बळ मिळालं. विशेष म्हणजे प्रविण आता बरा झाला असून त्याला भेटून खूप आनंद वाटला”.

रोहित पवारांच्या या ट्विटर पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून पोस्टला हजारो लाईकही आले आहे. तसेच सर्वच स्तरातून त्यांचं कौतूक होत असताना पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!