Share

राज ठाकरे जातीवादी, त्यांना अटक करा! ; संभाजी ब्रिगेडची मागणी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नव्या कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत पुन्हा एकदा मशिदींवरील भोग्याचा मुद्दा उपस्थित केला. त्या भाषणाची औरंगाबाद पोलीस चौकशी करत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. याशिवाय शहर पोलिसांना जाहीर सभेबाबतचा अहवाल महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, राज ठाकरेंना अटक करुन शांतता प्रस्थापित करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

प्रवीण गायकवाड म्हणाले, “राज ठाकरे जातीयवादी राजकारण करत आहेत. महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू  आंबेडकरांचं नाव घेणाऱ्याला बहुजनवादी म्हणतात, जातीवादी नाही आणि हिंदू मुस्लिमांमध्ये दंगी लावणारा जो माणूस असतो त्याला जातीवादी  म्हटल्या जातं. जे राज ठाकरे आहेत. राज्य सरकारने आता राज ठाकरेंना अटक केली पाहीजे. राज्यात अस्वस्थता पसरली आहे, लोकांना असुरक्षीत वाटत आहे. उद्या ३ तारीख आहे ४ तारखेपर्यंत मुदत दीली आहे. त्यामुळे शांतता प्रस्थापीत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. तसेच सरकारने राज ठाकरेंना अटक करावी आणि समज द्यावी की त्यांची भूमिका राज्यघटनेच्या विरोधात आहे.”

दरम्यान, राज ठाकरे यांची संपूर्ण सभा आणि भाषण रेकॉर्ड करण्यात आल्याची माहिती आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून हे रेकॉर्डिंग करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान अटींचे उल्लंघन केल्याने तपासानंतर पोलीस ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ४ मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्यासाठी अल्टिमेट दिला आहे. अन्यथा सर्व हिंदू या धार्मिक स्थळांच्या बाहेर हनुमान चालीसा वाजवतील, असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेश सरकार लाऊडस्पीकर काढू शकते तर महाराष्ट्र सरकार का काढू शकत नाही, असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ४ मे मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याच्या मुदतीनंतर जे होईल त्याला मी जबाबदार नाही, असा इशारा देखील ठाकरे यांनी दिला.

राज ठाकरे म्हणाले, त्यांना नीट समजले नाही तर आम्ही त्यांना महाराष्ट्राची ताकद दाखवू. “मशिदींवर लावलेले सर्व लाऊडस्पीकर बेकायदेशीर आहेत. इतके लाऊडस्पीकर वापरता ही मैफल आहे का?, असे देखील ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!