Share

नवाब मलिकांची प्रकृती अत्यंत गंभीर, स्ट्रेचरवरून हॉस्पिटलला आणले!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांची प्रकृती खालावली आहे. प्रकृती बिघडल्या नंतर त्यांना आज तुरुंगातून दवाखान्यात घेऊन गेले आहेत. नवाब मलिक यांची प्रकृती तीन दिवसांपासून खराब होत होती. त्यांनी विशेष न्यायालयात वैद्यकीय कारण दाखवून जामिनासाठी अर्ज केला आहे. ईडीला आज नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आपलं म्हणणं दाखल करायचे होते. मात्र या दरम्यानच मलिक यांची प्रकृती खालावली आहे.

नवाब मलिक यांच्या वकिलांनी सांगितले की, मलिकांची प्रकृती मागील काही दिवसापासून खराब होत आहे. मलिकांची प्रकृती ढासाळल्यावर स्ट्रेचरवर त्यांना आर्थर रोड जेलमधून जे जे हॉस्पिटलला आणलं गेलं. ईडीने यावर विचारले आहे की, जर नवाब मलिकांची प्रकृती खराब होती तर तपास पथकांना का कळवलं गेलं नाही. यावर आता ईडीने पुढच्या तारखेला सुनवाईची मागणी केली आहे. मात्र न्यायालयाने सांगितले की, आरोपीच्या प्रकृतीचा प्रश्न जास्त महत्वपूर्ण आहे.

नवाब मलिक यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून आज त्यांना स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवाब मलिक तीन दिवसांपासून खूप आजारी आहेत. मलिक यांच्या वकिलांनी विशेष पीएमएलए कोर्टात ही माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!