🕒 1 min read
मुंबई : आज आपण भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. याच पार्श्वभूमीवर आज देशभरात विविध राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज टिळक भवन या काँग्रेसच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अनेक जेष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी भाजपवर सडकून टीका केली आहे.
“पंतप्रधान मोदी म्हणाले होते कि आम्ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत सर्वांना घर देऊ. पण हर घर तिरंग्याचा नारा दिल्यावर अनेक लोक म्हणले कि आम्ही तिरंगा तर घेऊ पण तो लावायला घर कुठे आहे? जे लोक तिरंग्याला मानत नव्हते तेच आज देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवत आहेत. परंतु यामुळे राष्ट्रध्वजाचा मान राखला जात नाहीये. हे दुरंगे तिरंग्याला संपवायला निघालेत. पण मला विश्वास आहे कि, काँग्रेस विचारांचे सगळे लोक, सगळ्या जाती, धर्मांचे लोक या देशाच्या तिरंग्याला वाचवण्यासाठी एकजुटीने लढतील. तिरंग्याचा मान आणि सन्मान कायम राखण्यासाठी प्रयत्न करतील.”, असे नाना पटोले म्हणाले.
तसेच पुढे ते म्हणाले कि, “देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या, इंग्रजांशी झगडणाऱ्या मंगल पांडे, महात्मा गांधी, सरदार पटेल, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरु, नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांची एक चित्रफिती केंद्र सरकारने बनवली नाही. उलट सरदार पटेलांचे नाव बदलून स्टेडियमला स्वतःच नाव दिलं.”
संविधानामुळेच स्वातंत्र्य टिकले
नाना पटोले म्हणाले कि, “जसे आपला देश स्वतंत्र झाला तसंच जगातील इतर देशही स्वतंत्र झाले पण त्यांचे स्वातंत्र्य फारकाळ टिकले नाही. कारण त्या देशांमध्ये लोकशाही व संविधान नव्हते. आपल्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान आणि लोकशाही आहे, तसेच देशातील सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा काँग्रेसचा विचार होता. त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत.”
महत्वाच्या बातम्या:
- Independence Day | OBC, मराठा यांना आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध – एकनाथ शिंदे
- Big Breaking । अंबानी कुटुंबाला पुढील तीन तासांत संपवण्याची धमकी
- Devendra Fadnavis | लोकांच्या मनामध्ये सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या योजना हे सरकार निश्चित राबवेल – देवेंद्र फडणवीस
- Sudhir Mungantiwar। नक्षलग्रस्त भागात पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी भारत बटालियन-4 ची स्थापना – सुधीर मुनगंटीवार
- Independence Day | “या इव्हेंटबाजीत तिरंग्याचा मान राखला जात नाही”; नाना पटोलेंची ‘हर घर तिरंगा’वर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
