🕒 1 min read
मुंबई : आज आपण भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. याच पार्श्वभूमीवर आज देशभरात विविध राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज टिळक भवन या काँग्रेसच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अनेक जेष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी भाजपवर सडकून टीका केली आहे.
केंद्र सरकारकडून राबवण्यात आलेल्या हर घर तिरंगा या अभियानावरही त्यांनी भाष्य केले. “ज्यांना कधीही तिरंगा मान्य नव्हता, तेच लोक आज देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवत आहेत, हाच काँग्रेसच्या विचारांचा विजय आहे. तिरंग्याचा मान राखला पाहिजे हा काँग्रेसचा विचार आहे. पण या अभियानाच्या इव्हेंटबाजीत तो राखला जात नाहीये.”, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच पुढे नाना पटोले असंही म्हणाले कि, “हर घर तिरंगा अभियानासाठी चीनमधून झेंडे आयात करण्यात आले आहेत, त्यामुळे याचा फायदा भारतापेक्षा जास्त चीनलाच झाला आहे. त्याचबरोबर या झेंडयाचा रंग, आकार आणि त्यावर असेलेले अशोक चक्र याचा काही ताळमेळ लागत नाही.” चीनवरून आलेले हे झेंडे भारतीय राष्ट्रध्वजापेक्षा काहीसे वेगळे दिसत असल्याचं ते म्हणाले.
संविधानामुळेच स्वातंत्र्य टिकले
नाना पटोले म्हणाले कि, “जसे आपला देश स्वतंत्र झाला तसंच जगातील इतर देशही स्वतंत्र झाले पण त्यांचे स्वातंत्र्य फारकाळ टिकले नाही. कारण त्या देशांमध्ये लोकशाही व संविधान नव्हते. आपल्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान आणि लोकशाही आहे, तसेच देशातील सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा काँग्रेसचा विचार होता. त्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत.”
महत्वाच्या बातम्या:
- Ajit Pawar। ‘कुवत नसलेली लोकं सत्तेत बसत असतील तर..’; अजित पवारांचं मोदींना प्रत्युत्तर
- Sonia Gandhi on Independence Day | “स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला तुच्छ लेखण्याचं काम सुरु”; सोनिया गांधींची भाजपवर जोरदार टीका
- Prakash Ambedkar। ‘हर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय कार्यक्रम नसून…; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल
- Independence Day | परिवारवाद देशासाठी धोकादायक आहे, त्याचे शुद्धीकरण आवश्यक आहे – पंतप्रधान मोदी
- Independence Day | “गांधींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्वत:ला समर्पित केले” ; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे संबोधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
