Share

Devendra Fadnavis | लोकांच्या मनामध्ये सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या योजना हे सरकार निश्चित राबवेल – देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज देशभरात विविध राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजपचे नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राज्यातील सरकार समाजात सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या योजना राबवेल, असे आश्वासन दिले.

“आपला स्वातंत्र्यदिन चिरायू होवो, अशी प्रार्थना करतो. पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे आता आपला अमृत काळ सुरु झाला आहे. त्यामुळे आपल्याला पुढच्या २५ वर्षाचा विचार करून बलशाली भारत तयार करायचा आहे. सर्वसमावेशक विकास करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार सर्वांना सोबत घेऊन एक मजबूत, बलशाली आणि विकसित महाराष्ट्र तयार करेल. दीन दलित, आदिवासी, शेतकरी, शेत मजूर, ओबीसी, महिला आणि बारा बलुतेदार अशा सर्वांच्याच आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या योजना हे सरकार राबवेल, असा विश्वास व्यक्त करतो.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!