मुंबई : पाकिस्तान आणि वेस्टइंडिज यांच्यात मुलतानमध्ये ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील २ सामना खेळायला गेला. सामन्यात पाकिस्तानच्या दमदार गोलंदाजीने वेस्टइंडीजचे फलंदाज ढेपाळले. हा सामना जिंकत पाकिस्तानने मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान एक गोष्ट दिसली जी पहिली तर खूपच अनोखी आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझममुळे पाकिस्तानला पाच धावांचे नुकसान सहन करावे लागले. बाबर आझमने क्षेत्ररक्षणादरम्यान आयसीसीचे नियम मोडले आणि त्यामुळे संघावर कारवाई करण्यात आली. वास्तविक बाबर आझमने क्षेत्ररक्षण करताना यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचा हातमोजा घातला होता. क्षेत्ररक्षणाच्या नियमांनुसार क्षेत्ररक्षकाने असे केल्यास ते बेकायदेशीर मानले जाते. बाबर आझमच्या चुकीचा फटका संघाला सहन करावा लागला आणि वेस्ट इंडिजला पाच जादा धावा देण्यात आल्या.
बाबर आझमने यष्टीरक्षकाचे हातमोजे घातले
वेस्ट इंडिजच्या डावाच्या २९व्या षटकात बाबर आझम स्टंपच्या मागे उभा होता आणि त्याने यष्टीरक्षकाचे हातमोजे घातले होते. क्रिकेटच्या २८.१ कायद्यानुसार, यष्टिरक्षकाव्यतिरिक्त इतर कोणत्याही क्षेत्ररक्षकाला हातमोजे किंवा लेग गार्ड घालण्याची परवानगी नाही. केवळ पंचांच्या संमतीने तुम्ही हात किंवा बोटासाठी कोणतेही संरक्षण वापरू शकता.
A rare thing happened tonight. West Indies were awarded 5 penalty runs due to illegal fielding by Pakistan.
Laws of cricket:
28.1 – No fielder other than the wicket-keeper shall be permitted to wear gloves or external leg guards. #PakvWI pic.twitter.com/WPWf1QeZcP
— Mazher Arshad (@MazherArshad) June 10, 2022
या सामन्यात पाकिस्तानला ५ धावांचे नुकसान सहन करावे लागले असेल पण त्यांनी हा सामना सहज जिंकला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा १२० धावांनी पराभव केला. प्रथम खेळताना पाकिस्तानने ८ बाद २७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना वेस्टइंडिजचा संघ १५५ धावांच्या माफक धावसंख्येवर बाद झाला. सामन्यात बाबर आझमने ९३ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७७ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमध्ये हा त्याचा सलग ९वा अर्धशतकाच्या पुढील धावसंख्या आहे. ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
या सामन्यातील विजयाने पाकिस्तानने ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. आता पाकिस्तानी संघाचे लक्ष्य वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देण्याकडे असेल. तर वेस्टइंडिजचा संघ मालिकेतील शेवटचा सामना जिंकून सन्मान राखण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यात वेस्टइंडिजच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडीज संघाचे फलंदाज पूर्णपणे ढेपाळले. या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना १२ जूनला खेळायला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

