🕒 1 min read
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला होता. आता टी-२० मालिकेतील दुसरा सामना १२ जून रोजी कटकमध्ये खेळला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे मागच्या मोठ्या काळापासून कटकमध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही. अशात चाहत्यांमध्ये या सामन्यासाठी उत्साह स्पष्टपणे दिसत आहे. या सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ शुक्रवारी (१० जून) ओडिशात दाखल झाले. दोन्ही संघ दुपारी दोनच्या दरम्यान भुवनेश्वरच्या बीजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. याठिकाणी त्यांचे स्वागत करण्यासाठी शेकडो क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
दोन्ही संघातील खेळाडू विमानतळावर एकमेकांशी चर्चा आणि चेष्टा मस्करी करताना दिसले. चाहते विमानतळावर आणि खेळाडूंच्या हॉटेल्सटच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित होते. एवढेच नाही, या दोन्ही ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा आवडत्या खेळाडूंची फक्त एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचे दिसले. खेळाडूंना याप्रसंगी कडक सुरक्षेसह बसमधून हॉटेलमध्ये पोहोचवले गेले. बीसीसीआयने दोन्ही संघांचा ओडिशामध्ये पोहोचतानाचा एका खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://twitter.com/BCCI/status/1535248257009405952?t=f4es69BkoLW0-lAARLIyNg&s=19
रविवारी खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या आधी ओडिशा पोलीस महासंचालक एसके बंसल यांनी वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा प्रशासनासोबत बाराबती स्टेडियममधील नियोजनाविषयी चर्चा केली. पत्रकारांसोबत बोलताना बंसल यांनी माहिती दिली की, ते खेळाडूंना कडक सुरक्षा देणार आहेत. रविवारचा सामना सुरळीत पार पडावा यासाठी आणि शनिवारी सराव सत्रासाठी सर्व नियोजन केले गेले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. दिल्ली येथे खेळलेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवून मालिकेत १-० ने आघाडी मिळवली आहे. त्यामुळे कटक येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
