मुंबई : भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मिताली राज आणि क्रिकेटमधील विक्रम हे नेहमीच एकमेकांना सोबती राहिले आहेत. नुकताच सहावा विश्वचषक खेळणारी मिताली ही सर्वाधिक विश्वचषक खेळणारी महिला क्रिकेटपटू आहे. याशिवाय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याचा विक्रमही मिताली राजच्या नावावर आहे. मिताली राजने नुकत्याच झालेल्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ८४ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या होत्या. हे तिचे विश्वचषकातील ११ वे अर्धशतक होते. जे विश्वचषकातील कोणत्याही खेळाडूने केलेले सर्वाधिक अर्धशतक आहे.
विश्वचषकातील अर्धशतकांची कामगिरी
नुकत्याच झालेल्या विश्वचषकात मितालीने वयाच्या ३९ वर्षी अर्धशतक झळकावून सर्वात वयोवृद्ध खेळाडू म्हणून ही कामगिरी केली. एवढेच नाही तर २००० मध्ये तिने सर्वात तरुण खेळाडू म्हणून अर्धशतकही केले होते.
कर्णधार असताना सर्वात जास्त सामने खेळण्याचा विक्रम
विश्वचषक सामन्यादरम्यान जेव्हा भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सामना खेळला होता, तेव्हा विश्वचषकातील कर्णधार म्हणून हा मितालीचा २४ वा सामना होता. तिने ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार बेलिंडा क्लार्कला मागे टाकले. याअगोदर २२ सामन्यांमध्ये कर्णधारपदाचा विक्रम क्लार्कच्या नावावर होता.
Thank you for all your love & support over the years!
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u— Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
महिला क्रिकेटपटू म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम
महिला क्रिकेटपटू म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मिताली राजच्या नावावर आहे. मितालीने ७ शतके आणि ६४ अर्धशतकांसह ७,८०५ धावा केल्या आहेत. सर्वाधिक ६४ अर्धशतकांचा विक्रमही मितालीच्या नावावर आहे. मिताली राज हिला भारत सरकारने अनेक सन्मानांनी देखील सन्मानित केले आहे. मितालीला २००३ मध्ये अर्जुन पुरस्कार, २०१५ मध्ये पद्मश्री आणि २०२१ मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय २०१७ मध्ये तिला विस्डेन लीडिंग महिला क्रिकेटर इन द वर्ल्डचा मान मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

