मुंबई : आपल्या डान्सच्या कौशल्यानं सा-यांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद या समाजकार्यात देखील सक्रीय दिसतात. याशिवाय दीपाली सय्यद सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असतात. तसेच अलीकडे त्यांचा राजकारणात देखील सहभाग वाढला आहे. मागच्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपवर सोशल मीडियावरून जोरदार निशाणा साधताना दिसतात. नुकतेच त्यांनी भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष आणि त्यांचा इतर १० सहकार्यांविरुद्ध आपल्या हत्येचा कट केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली हाती. यावरून चांगलेच राजकारण तापले होते. आता उमा खापरे यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर दीपाली सय्यद यांनी ट्विट करून खोचक टोला लगावला आहे.
दीपाली सय्यद ट्विट करून म्हणतात, “उमा खापरे यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे आभार मानले पाहिजेत, शिवसेनेमुळे भाजपात कोणी आमदार बनत असेल तर त्याबद्दल शिवसेनेचे कौतुकच आहे. जय महाराष्ट्र. ”
उमा खापरे यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे आभार मानले पाहिजेत, शिवसेनेमुळे भाजपात कोणी आमदार बनत असेल तर त्याबद्दल शिवसेनेचे कौतुकच आहे. जय महाराष्ट्र @ShivSena @bjpsamvad
— Deepali Sayed (@deepalisayed) June 8, 2022
उमा खापरे यांनी काही दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पंतप्रधानांबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्याने त्यांनी ही तक्रार दाखल केली होती. तसेच त्यांनी दीपाली सय्यद यांना घरात घुसून मारू, असे जाहीरपाने म्हंटले होते. यानंतर दीपाली सय्यद यांच्याकडूनही उलटतक्रार दाखल करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

