🕒 1 min read
दिल्ली : गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी 30 राऊंड गोळीबार करण्यात आला. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या लकीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान सिद्धू मुसेवाला यांना आज शेवटची प्रार्थना करण्यात आली यावेळी त्यांचे वडील बलकौर सिंग खूप भावूक झाले होते.
मुसेवालाच्या अंतिम क्षणी भावूक होत त्यांचे वडील म्हणाले, माझा मुलगा एक साधा मुलगा होता. गावातून बस नसल्यामुळे माझा मुलगा दुसरी पासून बारावी पर्यंत शाळेत जाण्यासाठी रोज २४ किलोमीटर सायकल चालवायचा. माझ्याकडे फारशी जमीनही नव्हती आणि माझ्याकडे पैसेही नव्हते. मात्र त्याने आपल्या मेहनतीने सर्व काही साध्य केले.
ज्या दिवशी सिद्धू मुसेवाला यांच्यावर हल्ला झाला त्या दिवशी मुसेवाला यांच्या वडिलांना त्याच्यासोबत जायचे होते. याबाबत माहिती देताना मुसेवालाचे वडील म्हणाले, मलाही त्याच्याबरोबर जायचे होते पण त्याने मला त्याच्यासोबत नेले नाही म्हणाला तुम्ही शेतातून आला आहात आराम करा. सिद्धू मुदेवालाच्या हत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
