Share

संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर भातखळकरांनी म्हटले “मिठीचा नाला”

Published On: 

मुंबई: मराठवाड्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन होऊन 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या शाखेचा वर्धापनदिन आज असून  त्यानिमित्त औरंगाबादला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. यावर विरोधक टीका करण्याची एकही संधी सोडत नसताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांची तोंड हे गटार असल्याचे म्हटले आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एकाच शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

“मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या विरोधकांचं तोंड नसून गटार आहे इति संजय राऊत. आणि टीका करतोय कोण? मिठीचा नाला.”, असे ट्वीट करत मोजक्या शब्दांत अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांचा चांगलाच टोला लगावला आहे.

दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावे याचे भान विरोधकांनी ठेवले पाहिजे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखाविषयी तुमचा व्यक्तिगत आकस असू शकतो, त्यांनी जे काही मोठे काम केले आहे त्याविषयी, पण अशा प्रकारे जर तुमच्या तोंडातून भिजलेले फटाके फुटणार असतील तर त्याची पर्वा आम्ही करत नाही. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!