Share

रास्ता रोको करणाऱ्या साष्टपिंपळगावच्या मराठा आंदोलकांना अटक, गावात तणावाचे वातावरण!

Published On: 

🕒 1 min read

जालना : मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याचा निर्णय लागताच साष्टपिंपळगाव येथील आंदोलनकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १५ दिवसात जर सरकार अध्यादेश काढणार नसेल तर कोणत्याही नेत्याला रस्त्याने फिरू देणार नाही असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागताच इथल्या आंदोलनकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर रस्ता रोको करत आंदोलन सुरू केले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या नियमांचे उलंघन केल्यामुळे या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.

मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव मधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. २५ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळास वचन दिले होते की येत्या दोन दिवसात मराठा समाजाच्या मागण्यांना मंजूरी देऊ. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून ग्रामस्थांची कुठलीही विचारपूस करण्यात आलेली नाही.

राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थगित करण्यात आले होते. मात्र, या संबंधी अंतिम सुनावणी पाच न्यायाधिशांच्या पीठासमोर झाली. यामध्ये आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे.

या निकालामुळे उद्विग्न झालेल्या आंदोलनकर्त्यांची थेट रास्ता रोको करत आपला संताप व्यक्त केला. पोलीस प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला . मात्र, आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. कोरोनामुळे संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. यात मनोज जरांगे पाटील, शहादेव आवटे, मुक्ताबाई ढेपे, संतोष ढवळे यांना यावेळी अटक करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!