🕒 1 min read
औरंगाबाद : महाराष्ट्रात विविध कारणांसाठी स्थलांतरित झालेली बालके, स्तनदा आणि गरोदर मातांना पोषण कार्डच्या माध्यमातून पोषण आहार दिला जाणार आहे. यासंदर्भात राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त कार्यालयाने सर्व प्रकल्पांना सूचना दिल्यात. त्यासाठी हिरवे व गुलाबी कार्ड वापरले जाणार आहे. स्थलांतरित बालकांचे कुपोषण, बालमृत्यू, वजनात येणारी घट, माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासठी हा निर्णय घेण्यात आला.
राज्यात बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५५३ प्रकल्प कार्यरत आहेत. त्यापैकी ३६४ प्रकल्प ग्रामीण, ८५ प्रकल्प आदिवासी क्षेत्रात, तर १०४ प्रकल्प नागरी क्षेत्रात कार्यरत आहेत. यामध्ये विविध योजनांतून ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील ६५.१९ लाख बालकांना पोषण आहाराचा लाभ दिला जातो. तसेच ४.९२ लाख गरोदर व ५.९४ लाख स्तनदा मातांनाही आहार दिला जातो.
पण राज्यात काही जिल्ह्यातून मजुरी करणारे तसेच रोजगारासाठी विशिष्ट कालावधीसाठी लाभार्थी व त्यांचे कुटुंब बाहेर जिल्ह्यात स्थलांतरित होतात. त्यांना मूळ गावी असताना अंगणवाडी सेविकांमार्फत सर्व सेवा दिल्या जातात. पण स्थलांतराच्या कालावधीत त्यांना योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी बालकांमध्ये कुपोषण, बालमृत्यूचे प्रमाण, वजन घटण्याचे प्रमाण, महिलांमध्ये ॲनिमिया, माता मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यावर पर्याय म्हणून आता पोषण कार्डचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार हिरव्या रंगाच्या कार्डवर लाभार्थींच्या मूळ ठिकाणांच्या नोंदी घेतल्या जाणार असून त्यावर त्यांची वैयक्तिक माहिती भरली जाणार आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, नंदुरबार, धुळे, पालघर, ठाणे, वाशीम, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यातील लाभार्थी ऊसतोड, वीटभट्टी, रस्ते खोदकाम, इमारत बांधकाम या ठिकाणी कामासाठी स्थलांतरित होतात. त्यामुळे या जिल्ह्यांवर विशेष लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- पालकांना दिलासा! शाळांनी फीमध्ये १५ टक्के कपात करावी, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
- लातूरमध्ये छुप्या मार्गाने देशी दारूची विक्री सुरूच
- मराठा आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग केला बंद
- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता : महाजन
- ‘सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही ह्याचं खापर पण केंद्र सरकारवर टाका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
