Share

औरंगाबादेत लवकरच हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट, आदित्य ठाकरेंचा पुढाकार!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यासाठी हवेतून ऑक्सिजन निर्माण प्लांट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे औरंगाबादसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शहरात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून हे प्लांट कार्यान्वित होणार असल्याची माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

मार्च महिन्यात शहरात कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. शहरात बेडचा तुटवडा निर्माण झाला होता. बेड नसल्याने होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली होती. रुग्णांवर बेडसाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. बाधित रुग्ण गंभीर होत असल्याने त्यांना ऑक्सीजनची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यामुळे आता शहरातील कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची टंचाई दूर होण्याच्या दृष्टीने राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा नुकताच आढावा घेतला.

यावेळी पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी हवेतून ऑक्सीजन तयार करणारे दोन ऑक्सिजन प्लांट पालिकेला मिळावेत, अशी विनंती मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. ही विनंती मान्य करीत आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादसाठी दोन ऑक्सिजन प्लांट उभारुन देण्याचा निर्णय घेतला. हे दोन्ही प्लांट चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये उभारले जाणार आहेत.

हवेतून ऑक्सिजन तयार करणारे दोन प्लांट मेल्ट्रॉन कोविड सेंटर येथे उभारून देण्याची तयारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दर्शवली आहे. एका मिनिटात ६४० लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. हा ऑक्सिजन मेल्ट्रॉनमधील रुग्णांसाठी वापरण्यात येईल. तर उर्वरीत ऑक्सिजन साठवून ठेवला जाणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!