🕒 1 min read
लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. काही ठिकाणी नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. पण निलंगा येथे मात्र कोरोना परिस्थितीवरून सर्वपक्षीय नेते विरुद्ध प्रशासन असा संघर्ष पाहायला मिळतोय.
निलंगा तहसीलदारांनी पाठवलेल्या एकतर्फी अहवालावरून येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर पाटील यांना निलंबित करण्यात आले. परंतु तज्ज्ञ डॉक्टर अन् व्हेंटिलेटर वापराअभावी २७ एप्रिल ते ४ मे दरम्यान एकूण २६ रुग्णांचा मृत्यू झाला. याला तहसीलदार गणेश जाधव जबाबदार असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नेत्यांनी केला. शिवाय पत्रकार परिषद घेत त्यांना निलंबित करण्याची मागणीही केली.
डॉ.पाटील रुग्णांना बाहेरून औषध आणायला लावत असल्याचा अहवाल तहसीलदारांनी पाठवला होता. त्यावरून कुठलीही चौकशी न करता जिल्हाधिकाऱ्यांनी २७ एप्रिलला निलंबित केल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लिंबनमहाराज रेशमे, रिपाइं गटाचे प्रदेश सरचिटणीस विलास सूर्यवंशी, ओबीसी नेते प्रा. दयानंद चोपणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उल्हास सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या
- महत्त्वाचा निर्णय! राज्य सरकारचे नवीन ‘पोषण कार्ड’, स्थलांतरित मातांसह अपत्यांना फायदा
- पालकांना दिलासा! शाळांनी फीमध्ये १५ टक्के कपात करावी, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
- लातूरमध्ये छुप्या मार्गाने देशी दारूची विक्री सुरूच
- मराठा आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग केला बंद
- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता : महाजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
