Share

वडिलांना भीती होती की मुलगा वाईट व्यसनाच्या आहारी जाईल; मग उमरान म्हणाला, “मला व्यसन…”

Published On: 

मुंबई : हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या चर्चेत आहे. भारताकडे आता उमरानच्या रूपाने एक वेगवान गोलंदाज आहे जो सातत्याने १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो. क्रिकेट चाहते त्याच्याकडे भारतीय संघाचा भावी गोलंदाज म्हणूनही पाहत आहेत. सध्या उमरान मलिक हा भारतीय टी-२० संघाचा भाग आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी उमरान मलिक राहुल द्रविडच्या देखरेखीखाली जोरदार सराव करत आहे.

उमरान झपाट्याने क्रिकेट विश्वात स्वतःचे नाव कमावत आहे. पण एकदा इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देताना त्याच्या वडिलांनी भीती व्यक्त केली होती. उमरानच्या वडिलांनी सांगितले की, त्यांना भीती वाटत होती की, त्यांचा मुलगा ड्रग्ज घेण्यास सुरुवात करेल. जिथे उमरानला जात तिथे पार्ट्यांचे प्रकार सर्रास घडत असतात. त्यामुळे उमरानने भरकटत जाऊन अंमली पदार्थ घेण्यास सुरुवात करू नये. मात्र, वडिलांच्या या भीतीवर उमरानने आपल्याला फक्त क्रिकेटचे व्यसन असून खेळावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले होते.

उमरान मलिकचे वडील व्यवसायाने फळ विक्रेते आहेत. उमरान मलिकने त्यांच्याबद्दल बोलताना केले म्हंटले होते की, ‘ते हे काम कधीही सोडणार नाहीत कारण हा आमच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे जो गेल्या ७० वर्षांपासून चालत आहे.” उमरानच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील, काका हे सर्वच त्या कामाशी निगडीत आहेत आणि त्यांना त्यापासून वेगळे करता येत नाही. त्याचवेळी उमरानने आपल्या आईबद्दल सांगितले की, तो लहान असताना तो प्लास्टिकच्या बॉलने काच फोडायचा, नंतर त्याला आई खूप रागराग करायची. उमरानच्या म्हणण्यानुसार, त्याच्या आईने त्याला खेळण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!