मुंबई : रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीत मुंबई संघाचे नेतृत्व करणाऱ्या सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचे प्राची सिंग (Prachi Singh)सोबत ब्रेकअप झाले आहे. प्राची सिंग ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले जात होते आणि दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. खरंतर, दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे, ज्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि प्राची सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दोघेही एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करायचे. इतकेच नाही तर ते एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलले नाही. आताही पृथ्वी किंवा प्राची दोघांनीही ब्रेकअपबाबत काहीही सांगितलेले नाही.
प्राची इंस्टाग्रामवर २०० यूजर्सला फॉलो करते. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या ३९ हजारांच्या पुढे आहे. ती आतापर्यंत पृथ्वी शॉला फॉलो करत होती पण आता तिने इन्स्टाग्रामवर त्याला अनफॉलो केले आहे. यानंतर पृथ्वी शॉनेही प्राचीला अनफॉलो केले आहे. आता दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

