Share

Ranaji Trophy 2022 QF : सरफराज खानच्या शतकाबाबत सूर्यकुमार यादवने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…!

Published On: 

मुंबई : भारतीय संघाचा आणि मुंबई मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवचे दुखापतीनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) उपचार सुरू आहेत. दरम्यान, रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईच्या खेळावर प्रतिक्रिया देण्यापासून सूर्यकुमार यादव स्वतःला रोखू शकला नाही. त्याने शतक झळकावणाऱ्या सरफराज खानचे कौतुक केले आहे. याशिवाय सुवेद पारकरच्या पदार्पणातील रणजीतील द्विशतकावरही त्याने वक्तव्य केले आहे.

आपल्या ट्विटर हँडलवरून सूर्यकुमारने लिहिले की, “पदार्पणातील द्विशतक करत सुवेद पारकर यांची खास खेळी. सरफराज खान त्याचा धावांचा वर्षाव सुरू ठेवत आहे आणि ते पाहून मला खूप आनंद झाला आहे.” सूर्यकुमार यादवने या ट्विटमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनला टॅग करण्यासोबतच रणजी ट्रॉफीचा हॅशटॅग वापरला आहे.सरफराज खान गेल्या काही काळापासून रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. २४ वर्षीय फलंदाजाने मंगळवारी स्पर्धेतील शेवटच्या १३ डावांमध्ये १५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या. यावरून तो कोणत्या स्वरुपात खेळत आहे याची कल्पना नक्कीच येते.

त्याच्याशिवाय रणजी पदार्पणवीर सुवेद पारकरने दमदार खेळ केला. पहिल्याच सामन्यात बिशा तक झळकावून तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. ट्विटरवरही त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. शतक पूर्ण केल्यानंतर पारकरने संयमाने फलंदाजी करताना या शतकाचे द्विशतकात रूपांतर केले. २५२ धावांचा डाव खेळून तो बाद झाला. मुंबई संघाने पहिला डाव ८ बाद ६४७ धावा करून डाव घोषित केला.इतर काही फलंदाजांनीही मुंबईसाठी धावा केल्या. त्यात शम्स मुलानी आणि अरमान जाफर यांची नावे प्रमुख आहेत. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. अशा प्रकारे मुंबईने उत्तराखंडसमोर धावांचा डोंगर उभा केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!