Share

राजेश टोपेंनी आरोग्य भरती घोटाळा केला; गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

जालना : आमदार गोपीचंद पडळकर सतत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करत आहेत. दरम्यान पडळकर हे आज जालना जिल्ह्यातील काजळा गावात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

उपस्थित नागरिकांना संबोधित करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “पालकमंत्र्यांनी आरोग्य भरती परीक्षा मोठा घोटाळा केला. आरोग्यमंत्री परीक्षा रद्द करा म्हणेना आणि निकाल पण देईना? अशा कचाट्यात आरोग्यमंत्री अडकले होते. यांचा परीक्षा घोटाळा आम्ही येणाऱ्या अधिवेशनात बाहेर काढणार आहोत.”

“परीक्षा सेंटर देताना मुंबईच्या मुलांना जालना सेंटर असं कुठं झालं का? न्यासा सारख्या ब्लॅक लिस्ट कंपनीला आम्ही नकार देत असताना यांनीच, न्यासा सारख्या कंपनीला परीक्षा घेण्याचे काम दिल. त्याचं न्यासा कंपनी वाल्यांनी गोलमाल करत आत्ता यांना कचाट्यात अडकवले. आरोग्य मंत्री आणि न्यासा कंपनीने संगनमत करून हा घोटाळा केला”, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!