🕒 1 min read
मुंबई : अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) हे जोडपं सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका अरोरा पार्ट्यांची किती शौकीन आहे हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत मलायका दरवर्षी अर्जुन कपूरचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करताना दिसते. याववर्षी देखील मलायका अर्जुनाचा वाढदिवस खास पद्धतीने साजरी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
यावेळीही मलायकाने अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी खास प्लान केला आहे. मलायका अर्जुनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याला खासगी सुट्टीवर घेऊन गेली आहे. अशा परिस्थितीत हे स्टार कपल नुकतेच मुंबई विमानतळावर दिसले. याचदरम्यान अर्जुन मलायकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या तो व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CfLObuVldTC/
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा यावेळी फक्त जॅकेट आणि बूटमध्ये दिसत आहे. अर्जुन कपूरबद्दल सांगायचे तर तो कॅज्युअल लूकमध्येही खूप सुंदर दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
