Share

Nilesh Rane : “ठाकरे सरकारची ‘या’ दोन शब्दांनी वाट लावली”, निलेश राणेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ठाकरे सरकारची अवस्था अत्यंत डगमगीत स्थितीसारखी झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर सेनेला जशी गळतीच लागली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे ५० आमदारांचा गट तयार झाला आहे. तर आता सेनेकडे फक्त १५ आमदारांचा पाठींबा आणि साथ आहे. यावरूनच भाजपकडून सतत सेनेला टार्गेट केले जात आहे. भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“ठाकरे सरकारची या दोन शब्दांनी वाट लावली “नॉट रिचेबल” अगोदर सीएम नॉट रिचेबल आता आमदार नॉट रिचेबल.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याकडील आकडा हा महाविकास आघाडीचीही धडधड वाढवत आहे. शिंदेंच्या बंडानंतर मविआ सरकारही अडचणीत सापडले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ला रामराम ठोकला आहे. तर शिंदेंसह आमदारांनी आसाममध्ये तळ ठोकला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!