🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला गळतीचे जणू ग्रहणच लागल्याचे दिसून येत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. कालपर्यंत शिवसेनेत असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) नॉट रिचेबल दाखवत आहेत. त्यांचा फोन लागत नसल्याने अनेक चर्चांना उधान येत आहे. इतर आमदारांप्रमाणे भास्कर जाधवही ‘शिंदे’ सेनेत सहभागी तर नाही झाले ना? अशा चर्चा सकाळपासून रंगत होत्या. आता ही चर्चा भास्कर जाधव यांच्या स्विय सहाय्यकाने फेटाळली आहे.
भास्कर जाधव हे गुवाहाटीला जाऊन एकनाथ शिंदे यांना सामील होतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता भास्कर जाधव यांच्या स्वीय सहाय्यकाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. भास्कर जाधव हे सध्या चिपळूणमधील त्यांच्या निवासस्थानीच आहेत. ते गुवाहाटीला निघून गेले, ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांच्या स्वीय सहाय्यकाने सांगितले आहे.
सेनेशी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ४९ आमदारांचे पाठबळ आहे, तर शिवसेनेकडे १५ मात्र आता भास्कर जाधवही नॉट रिचेबल असल्यामुळे ही संख्या कमी होऊ शकते, अशा चर्चा रंगल्या होत्या.मात्र या राजकीय घडामोडींचा महाविकास आघाडीवर परिणाम होत आहे. मविआ सरकार डगमगीत होताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
