Share

महाराष्ट्र एकीकरण समितीची ‘सिल्व्हर ओक’वर धाव; राज्यातील खासदारांना पवार करणार एकत्र

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी बांधवांवर सुरु असणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात दाद मागण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आता राष्ट्रावादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे धाव घेतली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य शुक्रवारी सकाळी मुंबईतील शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याचे पाहायला मिळाले.

महाराष्ट्र एकीकरण समितीने कर्नाटक सरकारकडून सुरु असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. तसेच कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी समितीने शरद पवार यांची मदत मागितली आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला मदती करण्याचे आश्वासन दिले आहे. ‘लवकरच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेईल, यासाठी आपण प्रयत्न करु’, असे शरद पवार म्हणाले आहेत. सीमभागातील बांधवांच्या रक्षणासाठी शरद पवार महाराष्ट्रातील खासदारांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरणार का?, हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी बंगुळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर सीमा भागातील मराठी बांधव मोठ्या संतापाने रस्त्यावर उतरले होते. त्या पूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर कन्नडिगांकडून शाई फेकण्यात आली होती. अशा अनेक कारणांमुळे मराठी बांधव आणि कानडी प्रशासनात सातत्याने संघर्ष सुरु असतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने शरद पवारांकडे मदतीची धाव घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!