Share

“तेव्हा बघ्याची भूमिका घेणारे फडवणीस सभागृहात मोदींची नक्कल होताच….”; रुपाली पाटलांची टीका

Published On: 

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून(२२ डिसें.)सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे भाजपच्या सदस्यांनी विधानभवनात गोंधळ घातला. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadanvis) भास्कर जाधव यांनी केलेल्या कृत्यावरुन तीव्र आक्षेप नोंदवत भास्कर जाधव यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे(Rupali Patil Thombare) यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात रुपाली यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाली तरी बघ्याची भूमिका घेणारे फडवणीस साहेब , आज सभागृहात मोदींची नक्कल होताच “तडफनीस” झाले’, अशी बोचरी टीका पाटील यांनी केली आहे. तसेच शिवप्रेमी दूधखुळा नाही, तुमची निष्ठा कुठे आहे?महाराष्ट्रा समोर उघडे पडले आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, सभागृहात चर्चा सुरु असताना नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १५ लाखांच्या आश्वासनाचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा फडणवीसांनी, नरेंद्र मोदी कधीच असे बोलले नाही, असा दावा केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जागेवर उभे राहत नरेंद्र मोदी यांच्या शैलीत त्यांची वाक्य बोलून दाखवली. हे पाहून देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल करणे, हे योग्य नव्हे. सभागृहात अशाप्रकारचा पायंडा पडता कामा नये, असे फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!