Share

“लाखो युवकांच वाटोळं करायचा विक्रम ठाकरे-पवार सरकारच्या नावावर काळ्या कोळशाने लिहला जाईल”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २१ नोव्हेंबरला घेतलेल्या ‘टीईटी’ परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घ्यावी, अशी मागणी शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि टीईटी परीक्षा दिलेल्या उमेदवारांकडून होत आहे. २०२० मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणानंतर आता नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. यावरुन भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

याबाबत राम सातपुते यांनी ट्विट केले आहे. ‘लाखो युवकांच वाटोळं करायचा विक्रम या ठाकरे -पवार सरकारच्या नावावर काळ्या कोळशाने लिहला जाईल.’ अशी टीका राम सातपुते यांनी केली आहे.

शिक्षक पात्रा परीक्षेचे पेपर फोडल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन अनेकांना पास केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी परीक्षेचा कंत्राट दिलेल्या ‘जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ या कंपनीनेच पेपरफुटीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!