मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार पाडण्याबद्दल भाजप नेत्यांनी जाहिर सभेत विविध वक्तव्य केली होती. मात्र आजपर्यंत महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही फूट पडलेली दिसून येत नाही. त्यामुळे आता भाजप नेते पत्रकारांशी संवाद साधतानी सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत. याबाबत भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना एका वृत्तवाहिनीने सरकार पाडण्याबाबत प्रश्न विचारला असता रावसाहेब दानवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
रावसाहेब दानवे प्रतिक्रिया देताना म्हणाले, आता प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळे मुहूर्त बांधतो, शरद पवार देशाचे पंतप्रधान होणर आहे, असे राष्ट्रवादीने सांगितले होते. तो मुहूर्त कधी आहे सांगा तुम्ही. आम्ही कार्यकर्त्यांसमोर बोलताना कदाचीत असे म्हणालो असेल की, हे सरकार आपसात पायात पाय गुतून पडेल, पण हे सरकार आम्हीच पाडू आम्ही असं आम्ही म्हणालो नाही. असे स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.
सध्या चालू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेत्यांनी विविध मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार अपयशी ठरल्याचं विरोधकांकडून सांगितलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकार दोन पाऊल पुढं आलं असतं तर तोडगा निघाला असता’
- “आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करुन महाराष्ट्राला ‘नाईट क्लब’ बनवायचं का”
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध, रात्री जमावबंदी; आज होणार नवीन नियमावली जाहीर
- ‘…तरी खासगीकरणाचा ‘कोंबडा’ रोज आरवतोच आहे, हे तरी लक्षात घ्या!’
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

