🕒 1 min read
मुंबई : महिलांवरील अत्याचाराविरोधात तातडीने कठोर शिक्षा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्ती कायदा (Shakti Act) विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजुरी मिळाली आहे. हा कायदा अंमलात आल्यानंतर पहिला गुन्हा हा शिवसेनेचे आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांच्यावर दाखल झाला पाहिजे, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे.
विधानसभेत गुरुवारी महापौर किशोरी पेडणेकर आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमक्यांच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यावेळी शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी भाजपच्या विरोधात वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन आता चित्रा वाघ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
महिलांबाबत शिवसेनेचा काय दृष्टीकोन आहे हे आमदार अजय चौधरी यांच्या आजच्या विधानातून दिसून आलंय. त्यांनी महिलांना अपमानित करणारी भाषा वापरली आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे याची दखल घेत शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदार अजय चौधरींवर दाखल करावा, असे चित्रा वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
महिलांबाबत शिवसेनेचा काय दृष्टीकोन आहे हे आमदार अजय चौधरी यांच्या आजच्या विधानातून दिसून आलंय… त्यांनी महिलांना अपमानित करणारी भाषा वापरलीय..
माझी राज्य सरकारला विनंती आहे याची दखल घेत शक्ती कायद्यानुसार पहिला गुन्हा शिवसेना आमदार अजय चौधरींवर दाखल करावा..!@maharashtra_hmo
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 23, 2021
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार प्रत्येक माता-भगिनीचा आदर झाला पाहिजे असे म्हणाले. यामध्ये पक्षीय राजकारणही येता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. पण भाजपच्या महिला पदाधिकारी एरवी जरासे काही झाले की, लगेच सावित्रीच्या लेकींवर अन्याय झाला म्हणून बोंबलत, ओरडत सुटतात. मग मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ही सावित्रीची लेक नव्हे का, असा सवाल अजय चौधरी यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…आता तरी सत्तेत बसलेल्या बलात्काऱ्यांवर कारवाई व्हावी’, भाजपची मागणी
- “राज्य सरकारने ९,७१९ कोटी विमा कंपनीला दिले त्यापैकी ३,५०४ कोटीच शेतकऱ्यांना मिळाले”
- सत्तेचा माज चढणे म्हणजे काय हे शिवसेनेकडून शिकावं- अतुल भातखळकर
- महिलांचा मोठा विजय; ‘शक्ती कायद्या’ला विधानसभेत एकमताने मंजुरी
- वेंगसरकरांचे गांगुली-विराटबाबत मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
