🕒 1 min read
मुंबई: महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद असलेला ‘शक्ती’कायदा गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. ‘शक्ती’कायद्याचे (Shakti Act) विधेयक गुरुवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी विधानसभेत मांडले. आता विधेयक मंजूर होताच भाजप नेते अतुल भातखळकर ( Atul Bhatkhalkar) यांनी स्वागतही केले आहे, मात्र त्यांनी अप्रत्यक्ष महाविकास आघाडी मधील काही नेत्यांवरही निशाणा साधला आहे.
‘महिलांवरील अत्याचारांना चाप बसवणाऱ्या शक्ती विधेयकाला विधानसभेने एकमताने मंजुरी दिली आहे. आता तरी सत्तेत बसलेल्या बलात्काऱ्यांवर कारवाई व्हावी.’ असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी मधील नेत्यांवर निशाणा साधत बलात्काऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महिलांवरील अत्याचारांना चाप बसवणाऱ्या शक्ती विधेयकाला विधानसभेने एकमताने मंजुरी दिली आहे.
आता तरी सत्तेत बसलेल्या बलात्काऱ्यांवर कारवाई व्हावी. pic.twitter.com/UK4MSi4aLT— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 24, 2021
दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या शक्ती कायद्याला राष्ट्रपतींनी वेळेत मंजुरी द्यावी यासाठी केंद्रातील भाजप सरकारकडे पाठपुरावा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. दरम्यान विधान परिषदेत जरी हा कायदा मंजूर झाला असला तरी, राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी तो केंद्राकडे पाठवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महिलांचा मोठा विजय; ‘शक्ती कायद्या’ला विधानसभेत एकमताने मंजुरी
- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध, रात्री जमावबंदी; आज होणार नवीन नियमावली जाहीर
- ‘कडी लावून घरी बसणे हाच सर्व समस्यांवर एकमेव उपाय’, नवीन निर्बंधावरून भाजपची टीका
- “पेपरफुटीची सीबीआय चौकशी नको म्हणतयं, हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे”
- “मुख्यमंत्र्यांच्या अजारपणाबाबत इतकी गुप्तता का?”, नितेश राणेंचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
