Share

Shinde Government : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ११ जुलैनंतर होण्याची शक्यता; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Published On: 

मुंबई : राज्यात सध्या एकनाथ शिंदे व भाजप यांचे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. मात्र या सरकारच्या मंत्रिमंडळाचा अजून कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनीही मंत्रिमंडळाबाबत लवकरच निर्णय केला जाईल अशी माहिती दिली आहे. त्यामुळे आता कोणत्या नेत्याला किती आणि कोणते मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पद न मिळाल्यास अनेक नेत्यांची नाराजीही समोर येईल. मात्र ११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीनंतर केव्हाही निकाल लागण्याची शक्यता आहे. ११ जुलै रोजी सर्व याचिकांवर सुनावणी केल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित याचिकेवर १६ जुलैला सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर शिंदे गटाने जारी केलेल्या व्हीप विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही आव्हान दिलेले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टातील या याचिकांवर एकदा सुनामी झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

मागच्या महिन्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी सुरू केली होती आणि पक्षाच्या बहुतांश आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर ३० जून रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदाची शपथ दिली होती.

विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सोमवारी शिंदे-भाजप सरकारने विश्वास दर्शक ठराव बहुमताने जिंकला. या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना ‘मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना याबाबत चर्चा करायची आहे. ही वेळ आमच्यासाठी खूप व्यस्त राहिली आहे त्यामुळे आम्हाला नीट श्वास घेऊ द्या. त्यानंतर आम्ही मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत निर्णय घेऊ.’ असे सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!