Share

Winter Session 2022 | सीमाप्रश्नावर कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर

Published On: 

🕒 1 min read

Winter Session 2022 | नागपूर : महाराष्ट्र विधानसभेत सीमाप्रश्नावर कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ठराव मांडला. हा ठराव मांडल्यानंतर सीमाभागातील नागरीकांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली.

आवश्यक सर्व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन कर्नाटकातील बेळगावी, कारवार, निपाणी या शहरांसह महाराष्ट्रातील ८६५ गावांच्या प्रत्येक इंच जमिनीचा समावेश करण्यासाठी सरकार पावले उचलेल, असे ठरावात म्हटले आहे.

सीमा वादग्रस्त गावात राहणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन पूर्ण ताकदीने उभे राहील, असे ठरावात म्हटले आहे. लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याचे सरकारने विधानसभेत सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला विनंती करावी आणि सीमाभागातील मराठी लोकांच्या सुरक्षेची हमी सरकारला पटवून द्यावी.”

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!