🕒 1 min read
पंजाब : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान विवाहबंधनात अडकणार आहेत. भगवंत मान यांच्या जवळच्या कुटुंबात हा विवाह होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भगवंत मान यांचा त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत जी भगवंत मान यांच्या पहिल्या पत्नीसोबत अमेरिकेत राहतात. चंदीगडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या लग्नात खूप खास लोक उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भगवंत मान ज्यांच्याशी लग्न करत आहेत तिचे नाव डॉ. गुरप्रीत कौर आहे.
भगवंत मान यांच्या पत्नीबद्दल सांगितले जात आहे की ती त्यांच्या कुटुंबाच्या जवळ आहे. भगवंत मान आणि त्यांची भावी पत्नी एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. भगवंत मान यांच्या आईलाही मुलगी पसंत पडली. भगवंत मान यांच्या आईची इच्छा होती, त्याने दुसर लग्न कराव. भगवंत मान यांचा विवाह मुख्यमंत्र्यांच्या आई आणि बहिणीने निवडलेल्या मुलीशी म्हणजेच डॉ. गुरप्रीत कौरशी होणार आहे.
भगवंत मान यांच्या लग्नाचे आयोजन चंदीगडमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह काही खास व्यक्ती सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. भगवंत मान हे ४८ वर्षांचे असून, ते दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. भगवंत मान यांनी पहिली पत्नी इंद्रप्रीत कौरपासून घटस्फोट घेतला आहे.
भगवंत मान यांनी विनोदी कलाकार ते पंजाबचे मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. भगवंत मान पहिल्यांदा २०१४ मध्ये संगरूरमधून खासदार झाले. त्यावेळी त्यांच्या पत्नी इंद्रजीत कौरही या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. मात्र, एका वर्षानंतर २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर भगवंत मान यांनी राजकारणात पूर्णपणे झोकून दिले.
भगवंत मान यांनी १६ मार्च २०२२ रोजी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. घटस्फोटानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली होती ज्यात त्यांनी राजकारणासाठी पत्नीपासून वेगळे होत असल्याचे ननुद केले होते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
