Share

Sanjay Rathod : ‘…तर मी मातोश्रीत पुन्हा जाईल आणि उद्धव साहेबांशी बातचीत करेन,’ संजय राठोड यांच मोठं वक्तव्य

Published On: 

मुंबई : राज्यात सध्या एकनाथ शिंदे व भाजप यांचे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. मात्र या सरकारच्या मंत्रिमंडळाचा अजून कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनीही मंत्रिमंडळाबाबत लवकरच निर्णय केला जाईल अशी माहिती दिली आहे. त्यामुळे आता कोणत्या नेत्याला किती आणि कोणते मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पद न मिळाल्यास अनेक नेत्यांची नाराजीही समोर येईल.

दरम्यान शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर कडाडून टीका केली आहे. तर मातोश्रीचे दार उघडल्यास परत जाण्याची ही भावना त्यांनी व्यक्त केली आहे. दारव्हा मतदार संघातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी या बंडामागचे कारणही स्पष्ट केले आहे. राठोड यांनी संजय राऊत यांना बंडास जिम्मेदार मानले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळा जाळून त्यांच्या घरावर दगडफेक केल्यानं हे सर्व गोष्टी घडल्याचं त्यांनी सांगितलं. मातोश्रीचं दार पुन्हा आमच्यासाठी उघडल्यास मी पुन्हा मातोश्रीवर जाईल. उद्धवसाहेबांशी बातचित करेन, असं देखील त्यांनी म्हटलंय. मागच्या काही दिवसात शिवसेनेत झालेलं बंड शिवसैनिकांच्या जिव्हारी लागलं. या सगळ्या नेत्यांनी परत यावं, अशीच भावना सामान्य शिवसैनिकाची होती. मात्र संजय राठोड यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने नेटकऱ्यांकडून वेगवेगळा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.

‘मातोश्रीच दार आमच्यासाठी पुन्हा उघडल्यास, मी परत जाईन आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा देखील करेल’ अशी भावना यावेळी संजय राठोड यांनी बोलताना व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी बोलताना संजय राऊत यांच्यामुळेच ही बंडखोरी झाल्याचेही स्पष्ट सांगितले आहे.

बंडखोरीचे मुख्य कारण म्हणजे संजय राऊत – संजय राठोड
‘संजय राऊत हे अनेकवेळा कोणत्याही गोष्टींचा विचार न करता भाष्य करत असतात. त्यांच्या या बोलण्यामुळे अनेकांच्या भावनाही दुखावल्या जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा ही त्यांच्याच वक्तव्यामुळे जाळला गेला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या घरावर दगडफेक करण्यासही संजय राऊत यांनीच कार्यकर्त्यांना प्रवृत्त केले. अशी बिनकामाची भाषा वापरल्यावर कार्यकर्ते तर आक्रमक होणारच ना,’ असेही राठोड यावेळी म्हणाले.

संजय राऊत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलायचे
‘उद्धव ठाकरे यांना समजावून सांगण्यात व त्यांची समजूत काढण्यात मला व गुलाबराव पाटलांना यश आले होते. उद्धव ठाकरे तयारही झाले होते. सुरतला आदित्य ठाकरेंना पाठवायचं म्हणून ठरलं ही होतं. मात्र त्याचवेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे विरोधात बोलणं सुरू केलं म्हणून सगळं फिस्कटलं,’ असा मोठा खुलासा यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!