Share

Nitesh Rane : “वरुण सरदेसाई १०-१५ दिवस कुठेच दिसत नाही, सध्या तो मिस्टर इंडिया झालाय”; नितेश राणेंचा जोरदार टोला

Published On: 

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ खातेवाटप लवकरच जाहीर होणार आहे. मात्र दुसरीकडे शिंदे गटातील नेते आणि भाजप नेते शिवसेनेतील नेत्यांना टार्गेट करत आहेत. शिंदे गटातील नेत्यांच्या निशाण्यावर सध्या शिवसेना खासदार संजय राऊत आहेत. राऊतांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत. तर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनीवरुण सरदेसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

राणे म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांनी सत्तेचा गैरवापर करून त्यांनाच अडचणीत आणण्याचे काम केले. नेहमी दिसणारा सरकारी भाचा वरुण देसाई आता 10-15 दिवस कुठेच दिसत नाही. सध्या तो मिस्टर इंडिया झाला असल्याची टीका नितेश राणे यांनी वरुण देसाई यांच्यावर केली आहे. तसेच शिवसेनेचे आदेश बांदेकर, अनिल देसाई, अनिल परब हे नेते कधीही निवडून येत नाहीत मात्र सेनेतील वरिष्ठ नेत्यांचे कान भरणे, लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करण्याचे नाटक ही माणसं करत असल्यानेच शिवसेनेतून लोकं जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आज भरत गोगावले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत काय बोलतात त्याचे परिणाम काय होतात हे सर्वांना माहीत आहे. संजय राठोडांनी सांगितलं त्यात काही चूक नाही. राऊतांमुळे बंडखोरीची वेळ आली आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना बराचसा अवधी दिला होता. आम्ही वाट पाहत होतो. पण हे आमच्या लोकांची पदे काढून घेत होते. राऊतांची विधाने काळजाला घरं पाडणारी होती. काळजाला चरे पडत होते. नार्वेकरांना चर्चेला पाठवत होते आणि दुसरीकडे पदे काढून घेतली जात होती. तर राऊत तोंडाला येईल ते बोलत होते. त्यामुळे आम्हाला मजबुरीने हालचाली सुरू कराव्या लागल्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!