Share

ENG vs IND : जबरदस्त..! कसोटीबाहेर असलेल्या अश्विननं घेतला एकहाती कॅच; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी रवीचंद्रन अश्विनच्या जागी स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. जडेजानेही कर्णधार आणि प्रशिक्षकाच्या अपेक्षा पूर्ण केल्या. तथापि, बर्मिंगहॅम कसोटीत स्थान नाकारण्यात आल्यानंतर अनुभवी फिरकी गोलंदाज अश्विन निराश झालेला दिसत नाही. चौथ्या दिवशी सराव सत्रादरम्यान त्याने हवेत झेप घेत एका हाताने चेंडू पकडत सर्वांनाच चकित केले. अश्विनच्या या उत्कृष्ट झेलवर प्रेक्षक गॅलरीत बसलेले भारतीय चाहतेही खूश झाले. त्यांनी गोंगाट करत भारतीय खेळाडूला प्रोत्साहन दिले.

अश्विन हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. अशा स्थितीत बर्मिंगहॅम कसोटीसाठी अश्विनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न करणे हा अत्यंत आश्चर्यकारक निर्णय होता. मात्र, तेथील परिस्थिती पाहता संघ व्यवस्थापनाने अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला होता.

अश्विनने भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये ८६ सामने खेळले असून १६२ डावात ४४२ बळी घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये २३ वेळा चार विकेट्स आणि ३० वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे ५९ धावांत ७ बळी.

एजबस्टन कसोटीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४१६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लिश संघ २८४ धावांवर आटोपला. यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात २४५ धावा केल्या. ३७८ धावांचे लक्ष्य पार करून इंग्लंडने सामना जिंकला. त्यामुळे मालिकाही २-२ अशी बरोबरीत संपली.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!