Share

Eknath Shinde on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्याची हाक दिल्यास जाणार का? एकनाथ शिंदे म्हणाले…

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा झटका देत सत्तेवर विराजमान झाले. एकून ५० आमदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठींबा आहे. बंडखोर आमदार आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना, असा सामना सध्या राज्यात रंगला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तापरिवर्तन झाले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक समीकरणे बदलली आहेत. आता त्या बदललेल्या समीकरणांचा संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे. एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत अनेक विषयावर भाष्य केले.

एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंनी पुन्हा सोबत येण्याची हाक दिल्यास जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “ज्या प्रकारे आमच्यावर आरोप करत आहेत. पक्षातून काढलं आणि दुसरीकडे चर्चेसाठी माणसं पाठवली. आमचे पुतळे जाळण्यात आले, बदनामी करत आहेत, खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे ते पाहता त्यांना अशी अपेक्षा असेल असं वाटत नाही”.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी आणि भाजपला पाठिंबा देण्याबाबत स्पष्टीकरण दिले. शिवसेनेच्या आमदारांना महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करणे कठीण जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सांगितले. शिवसेना-भाजपने एकत्रितपणे निवडणूक लढवली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. यामुळे जेव्हा-जेव्हा हिंदुत्वाचे मुद्दे आले, दाऊदचा मुद्दा आला, मुंबई बॉम्बस्फोटाचा मुद्दा आला आणि इतर अनेक मुद्दे आले, तेव्हा आपण कोणताही निर्णय घेऊ शकलो नाही. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची विचारधारा मागे टाकली होती. अशा परिस्थितीत त्यांना हिंदुत्वाचा झेंडा उभारावा लागला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!