Share

Nitish Kumar | “बाॅयफ्रेंड बदलणाऱ्या महिलेसारखंच नितीश कुमार देखील सतत…” भाजप नेत्याचं अजब विधान

Published On: 

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी NDA युती सरकारसोबत संबंध तोडून जनता दल आणि भाजपसोबत युती केली. मात्र भाजपमधील काही आठवड्यांच्या तणावानंतर त्यांनी भाजपसोबतसुद्धा संबंध तोडून RJD, काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांशी हात मिळवणी केली. एवढंच नाही तर गेल्या आठवड्यात नितीश कुमार यांनी राजदच्य पाठिंब्याने सरकार स्थापन केली. भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गी यांनी नितिश कुमारांवर खोचक टीका केली.

कैलाश विजयवर्गीय यांची नितीश कुमारांवर खोचक टीकाः


यानंतर, नितीश कुमार यांच्या सतत पक्ष बदलण्यावरून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी नितीश कुमारांवर खोचक टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी भाजप सोबतची युती संपुष्टात आणून महागटबंधनांशी हात मिळवणी केल्याचं, म्हटलं आहे. एवढंच नाही तर कैलाश विजयवर्गीय यांनी सतत बॉयफ्रेंड बदलणाऱ्या महिलांसोबत नितीश कुमारांची तुलना केली.

नितीश कुमारांवर टीकास्त्र सोडत असताना जेव्हा मी काही दिवस परदेशात होतो, तेव्हा इथल्या स्त्रिया कधीही बॉयफ्रेंड बदलत असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं, असं कैलास यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे बिहारचे मुख्यमंत्रीही तसेच असून कोणाचा हात धरतात तर कोणाचा हात सोडतात हेच कळत नाही, असं कैलाश यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांचं ट्विटः

दरम्यान, कैलाश विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर विजयवर्गीय यांचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओला ‘महिलांचा आदर दाखवणारे भाजप सरचिटणीसांचं उदाहरण’, असं कॅप्शन रणदीप सुरजेवाला यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!