Share

Tejas thackeray | ‘तेजोपर्व’ सुरु होणार?; दहीहंडीच्या बॅनर्सवर तेजस ठाकरेंचे फोटो

Published On: 

मुंबई : दहीहंडी हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणार सण आहे. आजच्या दिवशी ठिकठिकाणी भव्य दहीहंड्या बांधल्या जातात. जवळपास सर्वच नेते मंडळींकडून या दहिहंड्यांचं आयोजन केलं जात. दिग्गज नेते आणि अनेक कलाकारही या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. विशेषतः मुंबईच्या दहीहंडया आणि त्याच आयोजन करणारी अनेक मंडळं खूपच प्रसिद्ध आहेत. यातच शिवसेना नेत्यांच्या दहीहंडीच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्सवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचे कनिष्ठ सुपुत्र म्हणजेच तेजस ठाकरे हे देखील झळकले आहेत. त्यामुळे दहीहंडीच्या माध्यमातून तेजस ठाकरेंना राजकारणात लाँच केलं जाणार आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईतील अनके शिवसेना नेत्यांनी सालाबादप्रमाणे या वर्षीही भव्य दहिहंड्यांचे आयोजन केले आहे. त्यांनी दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या पोस्टरबाजीत तेजस ठाकरेंचे फोटो पाहायला मिळत आहेत. तसेच या बॅनर्सवर त्यांचा उल्लेख ‘युवा शक्ती’ असा करण्यात येतोय. त्यामुळे दहीहंडीचं औचित्य साधून तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होणार आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. याआधी तेजस यांचा शिवसेनेच्या कामात सक्रिय सहभाग नव्हता. ते शिवसेनेचा चेहरा म्हणून कधीही समोर आले नव्हते. मात्र पहिल्यांदाच ते मुंबईतील गिरगाव येथील दहीहंडी उत्सवाच्या बॅनर्सवर झळकत आहेत.

शिवसेनेला तारण्यासाठी तेजस येणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत भाजपबरोबर युती केली आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. मात्र तेव्हापासून शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा नवा चेहरा म्हणून आता तेजस राजकारणात सक्रिय होणार आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तानुसार तेजस हे युवासेनेची धुरा सांभाळणार आहेत. त्यामुळे तेजस हे यांची एन्ट्री कधी होणार आणि त्याचा शिवसेनेला किती फायदा होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!