Share

Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणी वाढणार; ईडीच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली असून आता राऊत यांच्या अडणींमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना अंमलबजावणी संचालयाने केलेल्या चौकशीमध्ये राऊत आणि त्यांचा परिवार एका बड्या बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्या वापरत असल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बिल्डर हा मुंबई पूर्व उपनगरातील रहिवासी आहे. तसेच संजय राऊत आणि त्यांचा परिवार वापरत असलेल्या दोन अलिशान गाड्या श्रद्धा डेव्लपर्सच्या संचलकांच्या आहेत. एवढंच नाही तर संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांच्या मतदारसंघामध्ये या संचालकांचे अनेक चालू आणि पूर्ण झालेले प्रकल्प आहे.

संजय राऊत यांना 1 ऑगस्टला ताब्यात घेण्यात आलं होतं –

31 जुलै रोजी ईडीने संजय राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. यानंतर मध्यरात्री 1 ऑगस्टला राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. अशातच बुधवारी ईडीने अवनी इन्फ्रास्ट्रक्चरवरही छापा टाकला. यावेळी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि पत्राचाळ प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी या दोघींनी ही कंपनी सुरु केलं असल्याचं समोर आलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!