Share

Thackeray vs Shinde | शिंदे आणि ठाकरे गटात ‘पोस्टर वॉर’; दहीहंडीच्या बॅनर्समुळे वातावरण तापले

Published On: 

मुंबई : आज महाराष्ट्रात दहीहंडी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. एकीकडे दहीहंडीचा जल्लोष तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात मात्र बॅनर्स (पोस्टर) वरून सामना रंगला आहे. या दोन्ही गटांच्या दहीहंडी आयोजनाचे बॅनर्स मुंबईभर लागले आहेत आणि बॅनर्सच्या माध्यमातूनच दोन्ही गट शक्ती प्रदर्शन करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात दोन्ही गटाचे नेते बॅनर्सच्या माध्यमातून एकमेकांविरुद्ध शेरेबाजी करत आहेत.

ठाण्यातील टेंबी नाका परिसरात शिंदे गटाची दहीहंडी पार पडणार आहे. तर जांभळी नाका परिसरात उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी आयोजन केलेली दहीहंडी पार पडणार आहे. ठाकरे गटाच्या पोस्टर्सवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. तर यात शिंदे गटाच्या पोस्टर्सवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे, आनंद दिघे, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचे देखील फोटो पाहायला मिळत आहेत. तर याच पोस्टर्सवर ‘शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही’ हे बाळासाहेब ठाकरेंचं विधान लिहून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

शिवसेना लावणार निष्ठेचा थर

ठाण्यातील ठाकरे गटाच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या परिसरातील बॅनर्सवर ‘निष्ठेचा थर’ अशी टॅगलाईन छापण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये एकप्रकारे पोस्टर वॉर सुरु असल्याचं चित्र मुंबई आणि ठाण्यात पाहायला मिळत आहे.

पोस्टर्सवर तेजस ठाकरेही झळकतायेत

मुंबईतील अनके शिवसेना नेत्यांनी सालाबादप्रमाणे या वर्षीही भव्य दहिहंड्यांचे आयोजन केले आहे. त्यांनी दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या पोस्टरबाजीत तेजस ठाकरेंचे फोटो पाहायला मिळत आहेत. तसेच या बॅनर्सवर त्यांचा उल्लेख ‘युवा शक्ती’ असा करण्यात येतोय. त्यामुळे दहीहंडीचं औचित्य साधून तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होणार आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. याआधी तेजस यांचा शिवसेनेच्या कामात सक्रिय सहभाग नव्हता. ते शिवसेनेचा चेहरा म्हणून कधीही समोर आले नव्हते. मात्र पहिल्यांदाच ते मुंबईतील गिरगाव येथील दहीहंडी उत्सवाच्या बॅनर्सवर झळकत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!