Share

Eknath Shinde | दहीहंडीचा साहसी खेळात समावेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात येत असून, राज्य सरकारतर्फे वर्षभर प्रो-गोविंदा स्पर्धा भरवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसेच गोविंदांना खेळाडूंसाठीच्या पाच टक्के कोट्यातून सरकारी नोकऱ्यांमध्येही आरक्षण मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्य सरकार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात असल्याची घोषणाही नुकतीच करण्यात आली होती. त्यातच आज दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणाही केली आहे. तसेच दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदाना सरकारी नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असून या गोविंदांना सरकारी नोकरीत प्राधन्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर दहीहंडी फोडताना पथकातील एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याला १० लाख रु. तर गोविंदा गंभीर जखमी झाल्यास ७.५० लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच एखादा अवयव निकामी झाल्यास 5 लाख रु अर्थ सहाय्य केले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. प्रो कबड्डी या प्रसिद्ध स्पर्धेप्रमाणे आता प्रो गोविंदा ही स्पर्धा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे दहीहंडी आता केवळ एक दिवस नाही तर वर्षभर खेळ रूपात खेळली जाणार आहे. या खेळात सहभागी खेळाडूंना इतर खेळाडूंप्रमाणे सुविधा दिल्या जातील. या बैठकीत दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!