Share

अभिनेत्री संयतिका बॅनर्जीचा गंभीर अपघात; धडकेत कारचा चुराडा

Published On: 

मुंबई : लोकप्रिय बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची (TMC) राज्य सचिव संयतिका बॅनर्जीचा (Sayantika Banerjee ) गंभीर अपघात झाला आहे. बांकुडाहून कोलकात्ताला येत असताना संयतिकाच्या कारला ट्रकने मागून धडक दिली आहे. या अपघातामध्ये (Accident) संयतिका जखमी झाल्या असून त्यांच्या कारचा चुराडा झाल्याची माहिती मिळाली आहे.

गुरुवारी संयतिका बांकुडाहून  कोलकत्ताला (Kolkata) जाण्यास निघाली होती. त्यावेळी एका ट्रकने तिच्या कारला मागून धडक दिली. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला आहे. अपघातामध्ये कारचा चुराडा झाला असून मोठे नुकसान झाले आहे. तसेच संयतिका देखील जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/CXIcR1ZvBTb/?

या प्रकरणी वर्धमान जिल्हा (Vardhaman district ) पोलिसांनी माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या कारला मागून धडक देणाऱ्या ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून हा केवळ अपघात आहे की कुणी कट रचला होता याबाबत तपास सुरु आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.

संयतिका ही एक अतिशय लोकप्रिय बंगाली अभिनेत्री आहे. तिने २०२१ मध्ये टीएमसीकडून बाकुडा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिचा अपघात झाल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!